कला विभाग

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढवण्यासाठी शाळेत कला विभाग सक्रिय आहे. येथे चित्रकला, हस्तकला आणि सर्जनशील प्रकल्पांवर विशेष भर दिला जातो.

प्रशालेतील विद्यार्थी दरवर्षी शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षेत सहभागी होतात. त्यात एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या सुंदर भित्तीचित्रांनी वातावरण शोभून दिसते. शाळा बाह्य चित्रकला स्पर्धांमध्येही सक्रियपणे भाग घेते आणि अनेक बक्षिसे प्राप्त करते.