आमची वैशिष्ट्ये – आधुनिक शिक्षणाची ओळख

मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर, पुणे ही शैक्षणिक गुणवत्ता, अनुशासन आणि सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध संस्था आहे. आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही प्रोत्साहन देतात.

  • कार्यतत्पर, कुशल आणि सेवाभावी कर्मचारीवर्ग तसेच तज्ञ, मेहनती शिक्षकांचे मार्गदर्शन.
  • सुसज्ज ग्रंथालय आणि टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची व संशोधनाची संधी.
  • अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक विभाग आणि ई-लर्निंग सुविधा इंटरनेटसह उपलब्ध.
  • इयत्ता 5वी ते 10वी सेमी-इंग्रजी वर्गांची सोय.
  • स्पोकन इंग्लिशचे स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग.
  • इयत्ता 10वीसाठी विनाशुल्क अतिरिक्त तासांची सोय.
  • शालेय शिस्त आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था.
  • शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
  • वक्तृत्व, लेखन, अभिनय, गायन, वादन, खेळ इत्यादी सर्व कलांना प्रोत्साहन.
  • विविध क्रीडांगणे – हॉकी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, सायकलिंग, व्हॉलीबॉल, खो-खो, कुस्ती, जलतरण, बुद्धिबळ, कराटे, योगासन – तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची परंपरा.
  • विविध बाह्य परीक्षांचे नियमित आयोजन.
  • मराठी वाङ्मय मंडळ, इतिहास मंडळ व विज्ञान मंडळाच्या माध्यमातून क्षेत्रभेटी आणि साहित्यिकांच्या भेटी.
  • विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षणाची सोय.
  • शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि सहाय्य.