ज्ञानमयो भव
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे,
मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर पुणे ५
मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर पुणे ५ ही प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची मातृशाखा असून, ९१ वर्षांची परंपरा, संस्कार आणि आधुनिक शिक्षण यांचा संगम येथे अनुभवायला मिळतो.
“शिस्त • संस्कार • सर्वांगीण विकास” हा आमचा मूलमंत्र आहे.
सिंहावलोकन
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात विविध शिक्षणसंस्थांची भरभराट होत असताना 'प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी' सारख्या आपल्या संस्थेचाही तितक्याच जलदगतीने विस्तार व्हावा ही खरोखरच स्पृहणीय बाब आहे. या संस्थेची मातृशाखा म्हणजेच मॉडर्न हायस्कूल, पुणे ५, ही संस्था यावर्षी ९१ वर्षे पूर्ण करीत आहे.
मॉडर्न हायस्कूलची स्थापना गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या प्रेरणेने बुधवार दि. १६ मे १९३४ या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलची वाटचाल सुरू झाली. विद्वान पुणेकरांना उद्देशून केलेल्या भाषणात 'महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अनेकविध विषयांतील दर्जेदार शिक्षण देणे' हा आपला प्रमुख हेतू गुरुवर्य कानिटकरांनी विशद केला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना त्यांच्यात शिस्तीचीही आवड निर्माण करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेची सुरुवात मेहुणपुऱ्यातील कै. गोंधळेकरांच्या वाड्यात झाली. उत्कृष्ट अध्यापन, प्रयोगशाळा आणि समर्पित शिक्षकांच्या कामगिरीमुळे लवकरच शाळेला सरकारी मान्यता मिळाली (१७ ऑगस्ट १९३४). त्यानंतर वाढत्या विद्यार्थ्यांमुळे नवीन जागेची गरज भासली आणि १९३९ मध्ये शिवाजीनगरमध्ये मॉडर्न हायस्कूलची भव्य दगडी इमारत उभी राहिली.
गुरुवर्य कानिटकर सरांनी शिक्षक व पाथरवट या दोन्ही भूमिका निभावत शाळेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे ‘मॉडर्न’चे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. विद्यार्थ्यांनी अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळवली आणि आजही शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख आहे.
आमचे प्रेरणादायी नेतृत्व
शाळेच्या प्रगतीमागे दूरदृष्टी असलेले आमचे नेतृत्व आहे. त्यांचे मार्गदर्शन, मूल्याधारित विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांमुळेच आमची शाळा शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात यशाची उंच शिखरे गाठत आहे.
कार्याध्यक्ष
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे 5.
प्रशालेचे माजी विद्यार्थी
कार्यवाह
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे
सहकार्यवाह
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे
शाळा समिती अध्यक्ष, उपकार्यवाह
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे
व्हिजीटर शाळा समिती
मुख्याध्यापिका
उपमुख्याध्यापिका
पर्यवेक्षिका