माजी विद्यार्थी – आमचा अभिमान
जगभर पसरलेले आमचे विद्यार्थी आजही मॉडर्न हायस्कूलचे नाव उज्ज्वल करत आहेत.
मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगरचे विद्यार्थी शिक्षण, संस्कार आणि मूल्यांसह सर्व क्षेत्रांत यशस्वी ठरले आहेत. आमचे माजी विद्यार्थी समाजसेवा, उद्योग, शिक्षण, विज्ञान, क्रीडा आणि कला या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. या पानाद्वारे आम्ही त्या सर्वांचा गौरव करीत आहोत.
बोर्डात आलेले विद्यार्थी
प्रत्येक वर्षी आमचे विद्यार्थी राज्य मंडळाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करतात. अनेकांनी गुणांच्या शिखरावर पोहोचून मॉडर्न हायस्कूलचा मान वाढवला आहे. येथे त्यांच्या यशोगाथांचा आढावा घेतला आहे.